अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीच्या वतीने मागासवर्गीय आणि आदिवासी नागरिकांना समाज उपयोगी भांडी व खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या २० टक्के राखीव निधीतून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ७० ते ७५ हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत, ग्रामपंचायत सदस्य दिनकर चव्हाण, लताबाई भिल, प्रमिलाबाई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समाजातील किशोर निकम, भागवत निकम, कैलास चव्हाण, नगराज पारधी, प्रमोद निकम, किसनसिंग पाटील तसेच ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरवर्षी विविध योजनांअंतर्गत गरजूंसाठी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याच परंपरेनुसार या वर्षीदेखील मागासवर्गीयांसाठी भांडी आणि खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. यापुढेही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असे उपक्रम सातत्याने राबविले जातील, असे सरपंच जगदीश निकम व उपसरपंच पिंटूभाऊ राजपूत यांनी सांगितले.