टाटा ‘300 चार्जिंग केंद्र’ उभारणार

ev 5ण्‍

मुंबई प्रतिनिधी । चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत वेगवान चार्जिंगची सुविधा देणारी ३०० केंद्रे उभारण्यासाठी टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स यांच्यात भागीदारी करार झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरु आणि हैदराबाद या महत्त्वाच्या शहरांमध्ये ही केंद्रे उभारली जातील. या कंपन्यांतर्फे पुण्यात सुरू करण्यात आलेल्या पहिल्या सात चार्जिंग स्टेशनचे नुकतेच उद्घाटन झाले. येत्या दोन महिन्यांत अन्य चार शहरांमध्ये आणखी ४५ चार्जिंग केंद्रे बसवण्यात येणार आहेत. टाटा मोटर्स डीलरशीप्स, टाटा समूहाची रीटेल आऊटलेट्स तसेच, इतर सार्वजनिक ठिकाणी ही केंद्रे उभारली जातील.

Protected Content