आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद तयार : देवेंद्र फडणवीस

cm aditya

 

नागपूर (वृत्तसंस्था) शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्यास आम्ही कधीही तयार आहोत. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिलेच असतील आणि ते सरकारमध्ये सहभागी झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केले आहे.

 

आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास कोणतीही अडचण नाही. आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे ठाकरे परिवारातील पहिले सदस्य ठरतील. तसेच त्यांना सरकारमध्ये पहायलाही आवडेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केले. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपा एकत्र लढणार आहेत. भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी आमच्या जुन्या मित्रपक्षांना बाजूला काढण्याची आमची संस्कृती नाही. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. गेल्या वेळी २०१४ मध्ये शिवसेनेच युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने १४४ जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या. आता अर्ध्या जागा घेऊन काही मित्रपक्षांनाही देण्याचा आमचा मानस आहे. आता आम्ही किती जागा जिंकू ते नक्की सांगता येणार नाही, मात्र यावेळचा विजय ऐतिहासिक असेल. तर आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी भाजप-शिवसेना युती होणारच, असेही फडणवीस म्हणाले.

Protected Content