पंचायत समितीमध्ये स्वच्छता सर्वेक्षणबाबत बैठक

baithak

रावेर प्रतिनिधी । येथील पंचायत समितीमध्ये आज दि. 3 ऑगस्ट रोजी गावातील स्वच्छता व त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी बैठक आयोजित केली असून त्यामध्ये कुटुंबिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, शाळा-आंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छताबाबत सर्वेक्षण करुन त्याच अहवाल सादर करण्यात आला.

त्याचबरोबर,  येथील हागणदारीमुक्त टप्पा २ क्रमांकाचे तालुका स्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस म.स.गटविकास अधिकारी एच.एन.तडवी, विस्तार अधिकारी.डी.एच.सोनवणे, सी.आर.महाले गट समन्वयक समाधान निंभोरे, समूह समन्वयक भीमराव तायडे, ग्रा.प.ग्रामसेवक स्वच्छता ग्रही संगणक परिचालक आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. या कार्यशाळेस स.गटविकास अधिकारी एच.एन.तडवी यांनी प्रास्ताविक केले, सी.आर महाले व डी.एच सोनवणे विस्तार अधिकारी यांनी शासन निर्णयात नमूद केलेल्या विविध बाबींचे मुद्देनिहाय प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेचे नियोजन करून गावस्तरावर विविध समित्या व त्यांचे कार्यं मूल्यमापन कसे करावे, सर्वेक्षणात येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बैठकीला तालुक्यातील डाटा ओपरेटर ग्राम सेवक स्वच्छता गृही अंगवाडीसेविका मदतनिस आशा वर्कर यांनी केली आहे.

Protected Content