वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फ्रीस्टाईल ग्रीक रोमन राज्य कुस्तिगीर संघाच्या आदेशान्वये विविध गटातील ग्रीको रोमन फ्री स्टाईल भुसावळ तालुका कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी वरणगांव येथिल श्री हनुमान व्यायामशाळेमधे संपन्न झाल्या.
सदरील कुस्ती स्पर्धांमधे १५ / वर्षाखालील गटात वैभव माळी ४४ कि. शे. साजिद बागवान ४८ कि. आदित्य सपकाळ ५२ कि. रिजवानखान सलाऊदीन५७ कि . शे . फैजल शे . रोशन६८ कि . तसेच १७ वर्षाखालील गटामधे सैयद आतीक सै असलम ५१ कि .आसिम इसरत शाह ५५ कि. फिरोजखान ६० कि . राहुल राखुंडे ६५ कि . हाजीम तेली ७१ कि. भावेश चौधरी ८० कि. शे नासिर ९२ कि . बागवान अबुजर११० कि . तर ग्रीको रोमन स्पर्धेमध्ये लकी संगेले ५१ किलो उदय पाटील 55 किलो मोहम्मद मसूद कुरेशी 60 किलो शाहिद साबीर शेख 65 किलो तसेच वीस वर्षाखालील फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात इमरान रजा कुरेशी 57 किलो शाहिद शेख जावेद 61 किलो शेख उमर तांबोळी 65 किलो अली फिरोज खान 79 किलो अमन कमालुद्दीन 86 किलो तर वैष्णवी जितेंद्र माळी पन्नास किलो व ग्रीक रोमन स्पर्धेत सुरज माळी साठ किलो प्रणय बावस्कर 63 किलो इत्यादी प्रकारे एकूण 25 मुलांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
जिल्हा स्पर्धा पाचोरा येथे दि २२ सप्टेंबर रोजी होणार आहे . यावेळी वरणगाव येथील चंद्रकांत हरी बढे वाय आर पाटील राजेंद्र चौधरी सीईओ सचिन राऊत यांचे हस्ते कुस्तीच्या जोडा लावण्यात आल्या. पंच म्हणून दिलीप संगेले, व संजय बावस्कर यांनी काम पाहिले. यावेळी भुसावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष नामदेव पहेलवान , उपाध्यक्ष सुपडु पहेलवान . सेक्रेटरी प्रशांत पहेलवान , दिनेश देशमुख, राजकिरण निकम, प्रशांत पहेलवान, जमील पहेलवान ‘ एकनाथ पहेलवान , संजय पहेलवान ‘ बाळासाहेब चव्हाण, हकीम पै .कमालुद्दीन पै. राम तुर्केले , भिवा पै .इच्छाराम पै . श्रीराम पै .सुरेश चौधरी, वैभव मेढे यांचे सह भुसावळ तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व शेकडो कुस्ती शौकीन यांची उपस्थिती होती. स्पर्धेमधे भुसावळ तालुक्यातील मल्लांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .यावेळी जिल्हा स्पर्धेसाठी जातांना सर्व मल्लांनी सुचनेप्रमाणे आवश्यक कागदपत्रे न चुकता सोबत घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले होते .