इंदिरा गांधी उर्दू विद्यालयात तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आज १९ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी नॅशनल एज्युकेशन सोसायटी, यावल व्दारा संचलीत इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कूल यावल जिल्हा जळगाव शाळेच्या प्रागंणावर संपन्न झाल्या. सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान नॅशनल एज्यु. सोसायटी यावलचे अध्यक्ष हे अध्यक्षस्थानी हाजी शब्बीर खान हे होते तसेच शाळेचे चेअरमन हाजी मुस्तुफरखान,सचिव हाजी जफरुल्ला खान,गुलाम रसूल अजीज खान व सर्व संचालक मंडळ या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.

या तालुका पातळीवरील कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन हाजी शब्बीर खान यांच्या हस्ते तर स्पर्धची नाणेफेक हाजी मुसतूफा खान यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमास सय्यद अशफाक अली, यावल तालुका क्रीडा समन्वयक दिलीप सांगले व राष्ट्रीय पंच खिळा सय्यद इरतेकाज अन्वर शाळेचे क्रीडा शिक्षक शेख सलीम, ए. डी. पाटील, कालकर कल्यानी, वानखेडे व यावल तालुक्यातील इतर क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले. या कबड्डी स्पर्धत पठाण अर्शद खान आणि कामिल शेख यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मुमताज बानो, मरियम बानो, गुलनाज बानो, इमाम शेख, शेख इफ्तेखार, नूर मोहम्मद व शेख फहीम यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

Protected Content