जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आला आहे. या केंद्राची राज्यस्तरीय समन्वयकांनी पाहणी करून येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय समन्वयक डॉ. सतीन अंकलू आणि समुपदेशक निशा कटारे यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाला भेट दिली. या भेटीत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात कार्यान्वीत करण्यात आलेल्या तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्राची त्यांनी पाहणी केली. यावेळी डॉ. सतीन आणि निशा कटारे यांनी केंद्रात रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. तसेच याठिकाणी उपलब्ध असलेल्या औषधोपचाराबाबतही समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, मानसोपचार विभागाचे डॉ. विलास चव्हाण, डॉ. आदीत्य जैन यांनी डॉ. सतीन यांचे स्वागत केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागांतर्गत स्थापन झालेल्या तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्राच्या अधिक माहितीसाठी ९३०७६२२६९२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मानसोपचार विभागातर्फे करण्यात आले आहे.