जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात सर्रासपणे सुरु असलेले सट्टा जुगारासह इतर अवैधधंदे बंद करण्यात यावे, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा दौर्‍यावर असलेल्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चोपडा येथील कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना अवैधंद्याबद्दल शोकांतिका व्यक्त करत कारवाईचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहे. तर याच कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावठी कट्टा वापरणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. मुक्ताईनगर तालुक्यात चांगदेव, चिंंचोल, मेहुण, अंतुर्ली, कुर्‍हाकाकोडा या परिसरात जुगाराचे क्लब सुरु आहेत. बोदवड येथेही निवडणुकीदरम्यान पैसे वाटप होवून वाद झाला. याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांना धक्काबुक्की करण्यात आली. तरी सर्रासपणे सुरु अवैधधंद्यावर कठोर कारवाई करुन अवैधधंदे कायमस्वरुपी बंद करावे अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

 

निवेदनावर जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला शहर अध्यक्ष मंगला पाटील, ऍड. सचिन पाटील, अरविंद चितोरीया, अरविंद मानकरी, ऍड. सचिन चव्हाण, ऍड. राजेश गोयर, जितूक बागरे, अशोक सोनवणे, ऍड. कुणाल पवार, अनिरुध्द जाधव, गणेश निंबाळकर, डॉ. रिझवान खाटीक, रियान काकर, अकिल पटेल, विनोद सुर्यवंशी, सुशील शिंदे, अशोक पाटील, रोहन सोनवणे, रहिम तडवी, विशाल देशमुख, किरण चव्हाण, अकिल पटेल, संजय हरणे, अमोल कोल्हे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

Protected Content