यावल महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन

यावल प्रतिनिधी | यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले.

यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन पंचायत समितीतील सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डी. एन .मोरे यांनी भूषविले.

सुहास कुलकर्णी यांनी मंडळाचे उद्घाटन करून ‘कोरोना नंतरची भारताची आर्थिक स्थिती’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला असून ही स्थिती सुधारण्यासाठी सर्व स्तरावर सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.” डी.एन.मोरे यांनी देखील अर्थव्यवस्थे संबंधी विचार व्यक्त केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.ए.पाटील यांनी केले तर आभार छत्रसिंग वसावे यांनी मानले. कार्यक्रमास प्रवीण पाटील सी.के.पाटील, डॉ.एस.पी.कापडे व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content