जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या बुधवारी पार पडलेल्या महासभेत रिक्त असलेल्या सात स्वीकृत सदस्य पदांसाठी अधिकृतपणे निवड करण्यात आली. या निवडीमध्ये सत्ताधारी भाजपसह शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही गटांतील अनुभवी चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
महासभेच्या अजेंड्यावरील महत्त्वाच्या विषयांपैकी एक असलेल्या या निवडीमध्ये भाजपतर्फे डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतांनी, प्रदीप रोटे आणि सुभाष शौचे या चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांच्या वाट्याला सर्वाधिक चार जागा आल्या आहेत.

शिवसेना शिंदे गटातर्फे नरेंद्र सोनवणे आणि हर्षल मावळे यांची नियुक्ती करण्यात आली, तर शिवसेना उबाठा गटाच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर शरद तायडे यांची निवड करण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत या सर्व नावांची अधिकृत घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला



