रावेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर येथील स्वामी एज्युकेशनल ग्रुप संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यावर्षीही शंभर टक्के निकाल नोंदवून आपल्या यशस्वी परंपरेची पताका फडकती ठेवली आहे. दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमधून एकूण १३१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी २५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. तर ८२ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान यश मिळवले आहे. या शाळेत साई श्रीराम पाटील याने ९६% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर साहिल कमाल तडवी याने ९५% गुणांसह द्वितीय आणि नैतिक गणेश सावळे याने ९४.२०% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. राधा अविनाश पाटील (९२.६०%) हिने चौथा, तर मयूर गोपाळ पाटील, अनिकेत सतीश चौधरी, नूतन रमेश चौधरी आणि साक्षी सुनील चौधरी (प्रत्येकी ९२.४०%) या चौघांनी पाचवा क्रमांक विभागून घेतला.
स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलनेही शंभर टक्के निकालाची आपली परंपरा जपली आहे. या शाळेतील कुमारी सिद्धी नरेंद्र पाटील हिने ९२.८०% गुण मिळवून प्रथम स्थान प्राप्त केले, तर जिया सुनील अस्वानी (८९.२०%) हिने द्वितीय आणि सनारियो मनू (८९%) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या शानदार यशाबद्दल स्वामी एज्युकेशनल ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पवार, सचिव मनीषा पवार, संचालिका डॉ. सुखदा पवार, संचालक पुष्पक पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्वामी विवेकानंद विद्यामंदिराचे प्राचार्य राजू पवार, पर्यवेक्षिका कीर्ती कानुगो, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे, इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य रातिष मोल सर, उपमुख्याध्यापक शिरीष मैराळे आणि विभाग प्रमुख अनिता पाटील यांनीही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. दोन्ही शाळांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे रावेरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.