कल्याणमध्ये ठाकरे गटाचा सस्पेन्स संपला; रमेश जाधव यांनी उमेदवार अर्ज घेतला मागे

कल्याण-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांच्याव्यतिरिक्त उमेदवार दिला होता. शिवसेना ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवार रमेश जाधव यांनी अर्ज भरला. छाननीमध्ये ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.

कल्याणचे माजी महापौर रमेश जाधव यांनीही शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावरून वैशाली दरेकर की रमेश जाधव ठाकरे गटाचा उमेदवार कोण असा सस्पेन्स निर्माण झाला होता. पण आज ६ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रमेश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर असा सामना होणार आहे.

Protected Content