झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना ईडीकडून अटक; राजीनामाही दिला

रांची-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना त्यांच्या घरुन ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीने त्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच त्यांना कधीही अटक होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

सक्तवसुली संचालनालयाने दीर्घ चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना ताब्यात घेतले आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीच्या टीमसोबत बुधवारी रात्री राजभवन गाठले. याठिकाणी त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. या काळात चंपाई सोरेन यांना विधिमंडळ पक्षाचा नेते म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे चंपाई सोरेने हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपालांनी हेमंत सोरेन यांचा राजीनामा स्वीकार केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार महुआ माजी यांनी माहिती देताना सांगितलं की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात येईल. त्यांच्याकडे पुरुसे संख्याबळ आहे. दरम्यान, हेमंत सोरेन यांनी मंगळवारी आमदारांची बैठक घेतली होती. त्यावेळी चंपाई सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Protected Content