यूपीमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार ; २० जणांचा मृत्यू

download 7 1

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी जवळपास २० जणांचा मृत्यू झाला आहे.

 

प्रयागराजमध्ये शुक्रवारी घर पडल्यामुळे ५ लोकांचा मृत्यू झाला. तर १० लोक जखमी झाले. अशाच प्रकारच्या एका घटनेत प्रतापगढमध्ये ४ आणि भदोहीमध्ये २ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका आप्तकालीन बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना २४ तासांच्या आत पावसामुळे संबंधित घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Protected Content