ऑक्टोबर महिन्यात तब्बल ११ दिवस बँकांना सुट्टी !

Banks ke1D 621x414@LiveMint

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । ऑक्टोबर माहिन्यात बँकेची कामे हातावेगळी करण्याचे नियोजन आताच सुरु झाले आहे. कारण या महिन्यात दसरा आणि दिवाळी आदी मोठे सण आल्याने बँका जवळपास ११ दिवस बंद राहणार आहेत.

अधिक माहिती अशी की, ऑक्टोबरमधील पहिली सुटी दोन ऑक्टोबरला गांधीजयंतीची आहे. त्यानंतर ६, ७ आणि ८ ऑक्टोबरला बँकांचे कामकाज बंद असेल. सहा ऑक्टोबरला रविवार असून, ७ ऑक्टोबरला महानवमी आणि ८ ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर १२ ऑक्टोबरला महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बँका बंद राहतील. १३ ऑक्टोबरला रविवार असल्यानेही बँका बंद असतील. २० ऑक्टोबरलाही रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्यातील चौथा शनिवार असल्याने २६ ऑक्टोबरला बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. दिवाळीला रविवारी (२७ ऑक्टोबर) सुरुवात होणार असून, २८ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे. २९ ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँका बंद राहणार आहेत. या तिन्ही दिवशी बँकांचे कामकाज बंद असेल.

Protected Content