पाणी टंचाई असताना पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे अघोरी पध्दतीने पूजन

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बुलढाणा जिल्हयातील पळशी झाशी या गावात अंधश्रध्देचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा टाकीखाली अघोरी प्रकाराने पूजा केली. ही घटना ५ मे रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. सकाळी गावकऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुणीतरी गावाच्या टाकीचे पूजन करून टाकीत विष कालवल्याची अफवाह या गावात पसरली आहे. हा विचित्र प्रकार अल्पावधीतच संपूर्ण गावात पसरला. दरम्यान, परिसरातील अंधश्रद्धा निर्मूलनचे सक्रिय कार्यकर्ते असलेले अभय मारोडे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत गावकऱ्यांची समजूत घातली. राज्यभरात मोठया प्रमाणात पाणीटंचाई असताना असा समाजात अफवाह पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहे.

Protected Content