गुटखा, पानमसाला विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुटखा, पानमसाला तंबाखू विक्रीस बंदी असतानाही किराणा दुकानात त्याची विक्री केली जात असताना एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत एकूण १ लाख ३० हजार ९८५ रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आला. ही कारवाई रविवार, ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मेहरूण परिसरात असलेल्या श्री स्वामी कृपा प्रोव्हिजनवर करण्यात आली. या प्रकरणी रात्री १० वाजता दुकान मालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील संतोषी माता चौकातील श्री स्वामी कृपा प्रोव्हीजन दुकानात प्रतिबंधित असलेला पान मसाला, गुटखा आणि तंबाखूची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सपोनि ए.सी. मनोरे, पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोकॉ हेमंत पाटील, कविता गवई, छगन तायडे यांना कारवाईच्य सुचना दिल्या. पथकाने रविवार ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता दुकानावर छापा टाकला.

यावेळी दुकानाची पाहणी केली असता तेथे वेगवेगळ्या कंपनीचे व लहान मोठे पानमसाला, तंबाखूचे एकूण १ हजार ३० पाऊच आढळून आले. या सोबतच १५ तंबाखूचे डबे आढळून आले. हे पाऊच सील करण्यात येऊन हस्तगत केले. या प्रकरणी पोकॉ छगन तायडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दुकान मालक दीपक रमेशचंद गंगराळे (वय-४०, रा. रामेश्वर कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि आसाराम मनोरे करीत आहेत.

Protected Content