पैसे वाटत असताना ५ काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक; २० लाखांची रोकड जप्त

बेळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बेळगावमध्ये ऐन लोकसभा निवडणूकीत आचारसंहिता भंग करणारी घटना घडली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच कार्यकर्ते घरोघरी पैसे वाटत असताना आढळून आले आहे. बेळगाव येथील गोकाक मतदारसंघात काँग्रेस ५ कार्यकर्ते पैसे वाटप करत करत होते. परंतू त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ते घरोघरी प्रत्येकी एक हजार रूपये वाटत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून वीस लाख रुपये जप्त केले आहेत.
भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका कारमध्ये काँग्रेस उमेदवाराची पत्रके आणि पैसेही पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी गोकाक पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. भाजपने बेळगावमधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल रवींद्र हेब्बाळकर यांना तिकिट दिले आहे.

Protected Content