चीनमध्ये कोरोनाचा कहर ! शांघाय येथे वाढवले लॉकडाऊन

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । जगभरात कोरोनाचे संकट कायम असून सर्वच देश कोरोना महामारीविरुद्ध लढाई लढत आहेत.चीनमध्ये कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आल्यापासून चीनमध्ये प्रथमच इतक्या संख्येत रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये सध्या कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून शांघाय हे त्याचे मुख्य केंद्र बनले आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने कहर केला असून लॉकडाउन लावण्याची वेळ ओढावली आहे. दरम्यान एकीकडे अनेक देश करोनाच्या विळख्यातून बाहेर पडत असताना चीनने मात्र जगाची चिंता वाढवली आहे. याचं कारण म्हणजे चीनमध्ये करोनाचा नवा उपप्रकार आढळला आहे. हा उपप्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटचा आहे. यामुळे चीनमध्ये एका दिवसात १३ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. शांघायमध्ये एकाच दिवसात विक्रमी 8226 रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही माहिती दिली आहे. चीनमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन प्रकार झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. तर शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

चीनमधील शांघाय शहरात कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आज निर्बंध हटणार होते. मात्र आज पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. शांघायमधील लाखो लोक सुमारे दोन वर्षांनंतर अतिशय कडक लॉकडाऊनमध्येच आहेत. 28 मार्च रोजी चीनच्या सर्वात मोठ्या शहराने कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन-चरणातील लॉकडाउन लागू केले होते. पूर्व शांघायसाठी सुरुवातीला पाच दिवसांच्या लॉकडाऊनची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर शहराच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाच दिवसांची बंदी घालण्यात आली होती.

Protected Content