पुरंदरेंच्या पद्मभूषणला जितेंद्र आव्हाड यांचा विरोध

ठाणे प्रतिनिधी । बाबासाहेब पुरंदरे यांना केंद्र सरकारने पद्मभूषण जाहीर केल्याचा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला असून पुन्हा एकदा वैचारिक आग लावण्याचे घोषीत केले आहे.

याबाबत वृत्तांत असा की, केंद्र सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रखर विरोध केला आहे. त्यांनी ट्विटरवर याबाबत विरोध व्यक्त करत पुन्हा एकदा शिवविचारांची महाराष्ट्र पेटविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”महाराष्ट्र पेटवणार परत एकदा शिवसन्मान परिषदा घेणार… ब.मो.पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांना मीठ चोळले.”

याचबरोबर, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर आपला एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, ”महाराष्ट्र भूषण दिला तेव्हाही आम्ही हेच सांगत होतो. ज्यांनी जिजाऊंची, छत्रपतींची बदनामी केली त्यांना का मोठं करताय? का पोसताय? जेम्स लेन म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. त्यांनीच जेम्स लेनला माहिती पुरवली होती. सोलापुरात त्यांनी पुस्तकाचं कौतुक केले होते. दर दोन-चार वर्षांनी तुम्ही महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणार्‍या पुरंदरेंना परत जर पडद्यावर अणत असाल, पुरस्काराने गौरविणार असाल तर हे पुरस्कार कशा माध्यमातून दिले जात आहेत, याबाबत सर्वसामान्यांचा मनात शंका निर्माण होत आहे. आम्ही महाराष्ट्रात वैचारिक आग लावणार!”

Add Comment

Protected Content