गृहमंत्री आज दुपारी घेणार पिडीत कुटुंबाची घेणार भेट

शेअर करा !

रावेर शालीक महाजन । राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख आज जिल्ह्यात येत असून ते बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाची दुपारी साडे तीन नंतर भेट घेणार असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

बोरखेडा येथील हत्याकांडांने प्रचंड खळबळ उडाली आहे. काल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह विविध मान्यवर लोकप्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यात माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे आदींसह पोलीस अधिकार्‍यांचा समावेश होता.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून ते शनिवारी जिल्ह्यात येत आहेत. ते बोरखेडा येथे पिडीत कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काल रात्री दिली होती.

या अनुषंगाने आज सकाळी स्थानिक महसूल प्रशासनाला गृंहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा प्राप्त झाला आहे. दरम्यान, या दौर्‍याला तहसीलदारांनी दुजोरा दिला आहे. यानुसार ना. देशमुख हे १.३० वाजता जळगावला विमानाने येणार असून ते दुपारी साडे तीन वाजता बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाची भेट घेणार आहेत. याप्रसंगी ते अधिकार्‍यांशी चर्चा देखील करणार आहेत. यामुळे आता गृहमंत्र्यांच्या दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!