श्रीनगर । चारही बाजूंनी जवानांनी घेरल्यानंतर जम्मू-काश्मिरातील एक दहशतवादी शस्त्रे फेकून शरण आला असून त्याच्या शरणागतीचा लष्कराने जारी केलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याने सुरक्षा जवानांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. या दहशतवाद्याने शरणागती पत्करल्याचा व्हिडीओ भारतीय लष्कराने शेअर केला आहे. या व्हिडीओत एक जवान झुडपांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्याशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. जहांगीर भट अशी या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. काही वेळाने दहशतवादी हात वर करुन आत्मसमर्पण करण्यासाठी येताना दिसत आहे. यावेळी जवान आपल्या सहकार्यांना कोणीही गोळी चालवणार नाही असं सांगतो.
दरम्यान, यासोबत लष्कराने अजून एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तरुणाचे वडील आपल्या मुलाला वाचवल्याबद्दल आभार मानताना दिसत आहेत. पुन्हा त्याला दहशतवाद्यांसोबत जाऊ देऊ नका, अशी विनंती ते जवानांकडे करत आहेत. तरुणाला सुरक्षित आणि जिवंत पकडल्याबद्दल अधिकार्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
खालील ट्विटमध्ये पहा लष्कराने जारी केलेला व्हिडीओ.
One SPO went missing with two AK-47 on 13 Oct 20. Same day, Jahangir Ah Bhat (31 yr old shopkeeper) from Chadoora had gone missing too. Today, he was apprehended with one AK rifle.#Kashmir https://t.co/D2p2WmHqal pic.twitter.com/44YdqxGTSe
— Chinar Corps🍁 – Indian Army (@ChinarcorpsIA) October 16, 2020