राष्ट्रवादीच्या कारखानदार आमदार पिता-पुत्रास इडीची नोटीस

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृतसेवा – सहा साखर कारखान्यासह सहकारी बँक, शिक्षणसंस्था, खाजगी उद्योजक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांना इडीकडून नोटीस देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदार संघातील आमदार बबनराव शिंदे यांचेसह त्यांचे पुत्र यांना सक्त वसुली संचालनालयाकडून नोटीस बजावण्यात आली असून पिता-पुत्र चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. सलग सहा वेळा माढा विधानसभा मतदारसंघातून बबनराव शिंदे आमदार म्हणून निवडून येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे मोठे उद्योगपती असून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुमारे सहा साखर कारखाने आहेत. शिवाय सहकारी बँक, शिक्षण संस्था तसेच अन्य खासगी उद्योगसंस्था आमदार शिंदे यांच्या कुटुंबीयांशी संबंधित आहेत.

आ. रणजितसिंह शिंदे सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अध्यक्ष आहेत. शेतकरी सह-सूतगिरणी मालमत्ता खरेदी, साखर कारखाना सभासदांच्या नावे परस्पर कर्ज, शेतकरी कर्जमाफी घोटाळा आदी संदर्भात नागनाथ कदम यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करीत इडीकडे तक्रार सादर केली होती. आमदार पिता-पुत्राविरूध्द यासंदर्भात चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार सक्त वसुली संचालनालयाकडून आमदार शिंदे पिता-पुत्रांना तीनवेळा नोटिसा बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

Protected Content