अखिल भारतीय मराठा महासंघाचा एसटी कर्मचारी संपाला पाठिंबा

खामगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने खामगाव येथे एसटी डेपो समोर सुरु असलेल्या कर्मचारी संपाला आज (दि.११) पाठिंबा देण्यात आला आहे.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे माझी जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ माने तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती अनिताताई तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे की मागील काही दिवसापासून एसटी कामगार संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्या विषयी आंदोलन सुरू केले आहे. हे त्यांचे आंदोलन न्यायिक असून त्यांनी केलेल्या मागण्या ह्या त्यांच्या व त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाच्या हिशोबाने एकदम रास्त असून शासनाने त्यांच्या या मागण्यांचा विचार मनापासून करणे गरजेचे आहे. त्यांच्या न्यायिक मागण्या मान्य करून संपूर्ण एसटी कामगारांचा व त्यांच्या परिवाराचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी हे आंदोलन असल्याने अखिल भारतीय मराठा महासंघ खामगावच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

याप्रसंगी एसटी कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हा पाठिंबा देण्याकरिता अखिल भारतीय मराठा महासंघ खामगावचे सर्व युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content