कोरोना हवेतून पसरतो, केवळ सोशल डिस्टन्स पुरेसं नाही ; लॅन्सेटच्या अहवालामुळे खळबळ

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लॅन्सेटच्या एका  अहवालामुळे खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भविष्यात आणखी ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

भारतात दूसरी लाट आली आहे. या  लाटेनं अनेकांना आपल्या कवेत घेतलं आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे.

 

कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा पुरावा असल्याचा दावा या समितीने केला आहे. सहा तज्ज्ञांच्या समितीने सखोल अभ्यास करून अहवालात ही बाब नमूद केली आहे. या समितीत अमेरिका, इंग्लंड, कॅनडामधील तज्ज्ञांचा समावेश आहे. रसायनशास्त्रज्ञ जोस लुईस जिमेनेज यांचाही समावेश आहे. ते कॉऑपरेटिव्ह इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन इनव्हारनमेंटल सायन्स आणि कॉलोरांडो विद्यापीठात कार्यरत आहेत.

 

 

लॅन्सेटच्या अहवालाची समीक्षा ऑक्सफर्ड विद्यापीठानंही केली आहे. त्यांनीही हवेतून विषाणू पसरत असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला आहे. मोठ्या ड्रॉपलेटमधून कोरोना पसरतो यात कोणतंच तथ्य नाही. उलट हवेतून कोरोना परसत असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं हा अहवाल गंभीरतेने घेऊन विषाणू रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असंही नमूद केलं आहे.

 

रिसर्च करण्याऱ्या तज्ज्ञांनी या अहवालात स्कॅगिट चॉयर आउटब्रेकची संज्ञा मांडली आहे. यात एका व्यक्तीकडून ५३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात केलेल्या निरीक्षणात प्रत्येक व्यक्ती एकाच पृष्ठभागावर हात लावण्यास गेली नव्हती आणि एकमेकांच्या संपर्कातही आली नव्हता. तरीही त्या लोकांना लागण झाली. याचा अर्थ कोरोना हवेतून पसरतो असा निष्कर्ष मांडण्यात आला. बंदीस्त जागेपेक्षा बाहेर सर्वाधिक वेगाने पसरत असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना लक्षणं दिसत नाहीत. मात्र त्यांच्या माध्यमातून फैलाव होत आहे. त्यामुळे मोठ्या ड्रॉपलेटपेक्षा हवेतून सर्वात जास्त वेगाने करोनाचे फैलाव होत असल्याचं मत या अहवालात मांडण्यात आलं आहे.

Protected Content