मोदींच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेणारा आयएएस अधिकारी निलंबित

narendra modi latest7 22 1490170271

 

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकाॅप्टरची एका अधिकाऱ्याने झडती घेतली होती. त्या अधिकाऱ्याला बुधवारी निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार, कर्नाटक कॅडरचे १९९६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी मोहम्मद मोहिसन यांना निलंबित करण्यात आले असून निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन न करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

संबलपूरमध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यासाठी निवडणूक आयोगाने ओडिशाच्या जनरल पर्यवेक्षकाला बुधवारी (१७ एप्रिल) रोजी निलंबित करण्याचे आदेश दिलेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालकांच्या अहवालाच्या आधारावर आयोगाने संबलपूरच्या जनरल पर्यवेक्षकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी १६ एप्रिल रोजी मोदींच्या हॅलीकॉप्टरची झडती घेण्यात आली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबलपूरमध्ये झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हॅलिकॉप्टरची चौकशी करणे निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येत नाही. एप्रिल २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या निर्देशानुसार, एसपीजी सुरक्षा प्राप्त असणाऱ्या व्यक्तींना अशा झाडाझडतीतून सूट प्राप्त होते. आयएएस मोहम्मद मोहसिन यांनी मोदींच्या हेलिकाॅप्टरमधील साहित्याची झडती घेतली होती. त्यामुळे नरेंद्र मोदींना ताटकळत थांबावे लागले होते.

 

विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाच्या एका टीमनं मंगळवारी एका रोड शोसाठी राउरकेलामध्ये आलेल्या बीजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हेलिकॉप्टरचीही झाडाझडती घेतली होती. पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, पटनायक यांनी चौकशी करणाऱ्या टीमला पूर्ण सहकार्य केले. चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते हेलिकॉप्टरच्या आतच बसून राहिले. दरम्यान, मोदींच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान हेलिकाॅप्टरमधून कथित काळा बाॅक्स नेण्यात आल्याचे सांगत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Add Comment

Protected Content