नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या आहेत.
लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची शाब्दिक जुगलबंदी चांगलीच गाजली होती. त्यामुळे मोदी यांच्या आजच्या शुभेच्छा वेगळे महत्व आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसने देखील आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडिओ शेअर करत राहुलला हॅपी बर्थडे म्हटले आहे. या व्हिडिओत राहुल गांधी यांच्याकडून लोकांना प्रेरणा घेता येईल, अशा पाच गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत.