शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. आज त्यांनीच याबाबत सूतोवाच केले आहे.

राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारीबाबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना शरद पवार यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या आखाडण्यात उतारण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सर्व नेते आणि पदाधिकार्‍यांनी मला तेथून लढण्यासाठी गळ घातली असून आपण यावर विचार करू शकतो. तर अजित पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतारण्यासाठी त्यांनी साफ नकार दिला. याप्रसंगी शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना लोकसभेत दिलेल्या भाषणावरून टीका केली. मोदींचे हे भाषण संसदेच्या सभ्यतेला हरताळ फासणारे होते. मोदींवर जसे संस्कार झाले, त्याला सुसंगत ते बोलले, असा टोला पवार यांनी लगावला. तर त्यांनी अण्णा हजारे यांनादेखील टोला मारत आपण अण्णा हजारे यांचे उपोषण, या विषयावर बोलणं, बातम्या वाचणे आणि पाहणे गेली २ वर्षे मी सोडून दिले असल्याचे प्रतिपादन केले.

Add Comment

Protected Content