पाचोऱ्यात गुरुवारी आ. किशोर पाटील यांच्या समर्थानार्थ रॅली

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आमदार किशोर पाटील यांच्या समर्थनार्थ गुरुवार दि. ३० जून रोजी पाचोरा येथे भव्य रॅली काढण्याचा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

 

आ. किशोर पाटील यांच्या निवास्थान ‘शिवालय’ येथे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन आज मंगळवार दि. २८ जून रोजी करण्यात आले होते. या बैठकीत सकाळी भडगाव तालुका, शहर, पाचोरा तालुका महिला आघाडी, पाचोरा शहर विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत तालूका प्रमुख शरद पाटील, नगरसेवक शीतल सोमवंशी, बंडू चौधरी, भडगाव पदाधिकारी विकास पाटील, राजेंद्र पाटील, युवराज पाटील, प्रशांत पवार, पाचोरा पदाधिकारी जितेंद्र जैन, संदीप राजे पाटील, मोहित पाटील,विजय राठोड, विशाल राजपूत, देवराम लोणारी, पप्पू महाजन, बापू हटकर, विशाल पवार, ईश्वर मराठे, महेंद्र पवार सुनील पवार योगेश शेळके, सुमीत खर्चाणे, मंदाताई पाटील, उर्मिला शेळके, बेबाताई पाटील, स्मिता बारावकर, जया पवार, सुषमा पाटील, मालती हटकर, संगीता पगारे, लता वाघ, सुनंदा महाजन, कल्पना पाटील, जया सुरवडकर उपस्थित होते.

सर्वांच्या सुखदुःखात अहोरात्र सोबत राहणाऱ्या किशोर पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा सर्वांनी एकमुखी निर्धार यावेळी व्यक्त केला.  यावेळी मंचावर सुनीता किशोर पाटील, मुकुंद बिलदीकर, किशोर बारावकर, सुमीत पाटील, चंद्रकांत धनवडे, गंगाराम पाटील, शरद पाते, जितेंद्र जैन, विजय राठोड, शिवदास पाटील हे होते. तर सुनीता पाटील, किशोर बारावकर, चंद्रकांत धनवडे,गणेश पाटील, शरद पाट, प्रवीण ब्राह्मणे, भय्या पाटील, योगेश जाधव , आभार सुमीत पाटील, सुषमा पाटील, विकास तात्या पाटील, प्रशांत पवार, शशिकांत येवले, डॉ. प्रमोद पाटील, इम्रान सय्यद, राजेंद्र पाटील, युवराज आबा पाटील उपस्थित होते.

Protected Content