लोण ग्रुप विकासोवर शेतकरी विकास पॅनलचे पूर्ण बहुमत

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील लोण येथील लोण गृप  विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत निर्विवाद बहुमताने सर्व उमेदवार निवडून आणले आहेत.

 

लोण गृप  विविध कार्यकारी सोसायटीची तेरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. तेरापैकी चार उमेदवार बिनविरोध झाल्याने नऊ उमेदवारांसाठी निवडणूक घेण्यात आली.  त्यात शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत नऊ उमेदवारांनी विजयश्री खेचुन आणली आहे. शेतकरी विकास पॅनलचे लोण गृप विकासोवर स्पष्ट बहुमत मिळवले आहे.  त्यात सर्व साधारण मतदार वर्गामधून भगवान पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हिरामण पाटील, राजेंद्र पाटील, महिला राखीव मतदार संघातून कमलबाई पाटील, संगीता पाटील, इतर मागासवर्ग मतदार संघातून निंबा पाटील, अनु.जाती-जमाती मतदार संघातून सुका भिल, विमुक्त जाती मतदार संघातून सुभाष राठोड आदी उमेदवार विजयी झाले आहेत. शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी किसन पाटील,अशोक पाटील, शिवाजी पाटील, विश्वास पाटील, विनोद पाटील, भगवान पाटील, कैलास पाटील आदींनी सहकार्य केले. शेतकरी विकास पॅनलच्या वतीने सर्व शेतकरी मतदार बांधवांचे आभार मानण्यात आले.

Protected Content