चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात शिवसेनेचा आज ‘रास्ता रोको’

पारोळा प्रतिनिधी | तरसोद ते अजंग दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ व निकृष्ट होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना रविवारी रास्ता रोको आंदोलन करणार आहे.

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६च्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने व निकृष्ट दर्ज्याचे सुरु असून सद्यस्थितीत अजंग ते तरसोद ह्या टप्प्यात नव्या व जुन्या दोन्ही महामार्गांवर रस्त्याला खोलवर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दिवसाला अनेक अपघात होवून मोठी जिवितहानी होत आहे. खराब रस्त्यावर किंवा काम सुरु असल्याचा बर्‍याच ठिकाणी सूचना फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह देखील लावलेले नाहीत. त्यामुळे रहदारी करणार्‍या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या बाबींचा विचार करता, संबंधीत कामाला गती मिळावी, रस्त्यावर पडलेले खोलवर खड्ड्यांना तात्काळ उच्च दर्जाच्या कामाने डागडूगी करण्यात यावी, निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी यामागणीसह तीव्र निषेध व्यक्त करत आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वात व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा शिवसेनेतर्फे रास्ता रोकोचे आयोजन रविवार रोजी सकाळी ११:३० वाजता दुर्गा पेट्रोल पंपाच्या पुढे(बायपास), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, म्हसवे शिवार, पारोळा ता.पारोळा जि.जळगांव येथे करण्यात आलेले आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन पारोळा शिवसेनेतर्फे करण्यात आलेले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!