ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची झोप उडेल : शेलार

ठाणे – राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीची झोप उडणार असल्याचा दावा करत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात गीता पठण व वंदे मातरम गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेलार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, एकीकडे कायम हिंदुत्वाची कास धरलेल्या शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली तर दुसरीकडे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत ठाणे भाजपतर्फे गीता पठणाची स्पर्धा ठेवण्यात आली. यावरुन खरा हिंदुत्ववादी पक्ष कोणता हे स्पष्ट झालं आहे. शिवसेना अजान स्पर्धा आयोजित करते, तर भाजपने ठिकठिकाणी गीता पठण आणि वंदे मातरम गायनाचे आयोजन करुन राष्ट्रभक्तीच्या दृष्कीकोनातून एक पाऊल पुढे टाकले आहे. यातून शिवसेनेने थोडीशी अक्कल घ्यावी.

विधानरिषदेतील पराभवापासून भाजपने धडा घेतला असून ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचे झोप उडेल असे निकाल येतील असे आशिष शेलार म्हणाले.

Protected Content