जळगावात कडाडणार्‍या डफासह मालमत्ता कराची वसुली

जळगाव प्रतिनिधी । महापालिका प्रशासनाने आधी जाहीर केल्यानुसार आजपासून डफ वाजवून मालमत्ता कर वसुलीस प्रारंभ केला आहे.

जळगाव महापालिकेती थकबाकी मोठ्या प्रमाणात बाकी असल्यामुळे प्रशासनाने धडक मोहीम सुरू करण्याचे आधीच जाहीर केले होते. यासाठी थकबाकीदार असणार्‍या नागरिकांच्या घरासमोर डफ वाजवून कर वसुली करण्याची संकल्पना अंमलात आणण्याचे जाहीर केले होते. यानुसार आज सकाळपासून डफ वाजवून कर वसुलीस प्रारंभ करण्यात आला.

सकाळपासून थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन महापालिका पथकाने कर वसुलीची माहिती संबंधीतांना देत त्यांना कर भरण्याचे सुचविले. दरम्यान, आपल्या घरासमोर डफ वाजत असल्याचे पाहून काही जणांनी महापालिकेच्या पथकाशी हुज्जत घालण्याचा प्रकार घडला. तर काहींनी मात्र कर भरला. या मोहिमेत पहिल्या दिवशी नेमकी किती वसुली करण्यात आली याबाबत मात्र प्रशासनाने माहिती दिली नव्हती.

Add Comment

Protected Content