पुण्यातील लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध !

पुणे (वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचडवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनला येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. व्यापारी महासंघातर्फे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच प्रशासनाला पाठवण्यात आले आहे.

 

लॉकडाऊन मुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. व्यापारी वर्ग आर्थिक तसेच मानसिक तणावाखाली आहे, अशा परिस्थितीत पुण्यामध्ये घोषित करण्यात आलेला लोकडाऊन मागे घेण्यात यावा, अशी विनंती व्यापारी महासंघाने केली आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनचे आदेश काढले आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे १० दिवस लॉकडाऊन राहणार आहे.

Protected Content