सात बलून बंधाऱ्यांसह तापी निन्म पाडळसरे प्रकल्पाला चालना मिळणार

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत मतदारसंघातील मागण्यांचे निवेदन दिल्यावर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सात बलून बंधारे आणि तापी निन्म पाडळसरे प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची भावना खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आपण सतत पाच वर्षे भरघोस निधी देत मतदारसंघाच्या विकासाची संधी दिली आहे. आज पुन्हा आपण राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्याने सात बलून बंधारे, निन्म तापी पाडळसरे प्रकल्प, कवियीत्री बहिणाबाई चौधरी दुर्लक्षित स्मारक, बालकवी ठोंबरे स्मारकाबाबत आपण संवेदनशिलपणे भूमिका घ्यावी. अशी विनंती खासदार पाटील यांनी भेटीत किली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सात बलून बंधाऱ्यांना पर्यावरण मान्यताबाबत संबधित विभागाला सूचना देत निन्म तापी पाडळसरे प्रकल्प पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत बैठक आयोजित करू. असे आश्वासन दिल्याने सात बलून बंधारे आणि तापी निन्म पाडळसरे प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिलेल्या निवेदनात जळगाव लोकसभा  मतदारसंघातील महत्वाकांक्षी व गिरणा खोरे समृद्ध करणारा सात बलून बंधारे प्रकल्पाला अद्यापही पर्यावरण मान्यता मिळालेली नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील अद्याप पावतो एक मान्यतेअभावी या प्रकल्पाला मिळणारी चालना रखडली आहे. त्याचप्रमाणे निन्म तापी पाडळसरे प्रकल्पाबाबत राज्य गुंतवणूक सहमती प्रमाणपत्र (SFC) नसल्याने हजारो एकरावर सिंचन क्रांती करणारा तापी निन्म पाडळसरे प्रकल्पास गती मिळत नाही.

तसेच गेल्या काही वर्षांपासून खान्देश कन्या जेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी  यांचे आसोदा येथील स्मारकाबाबत उदासीनता दिसून येत आहे. या स्मारकाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून ६० टक्के काम अपूर्ण असल्याने बहिणाबाई चौधरी स्मारक अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. या कामाला चालना देणेसाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला असून या जिव्हाळ्याचा विषयास चालना मिळावी. तसेच धरणगाव येथील बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मारकासंदर्भात राज्य सरकारने घोषणा करून देखील अद्याप पावतो त्या जागेवर कंपाउंड व्यतिरिक्त कुठलेही काम झालेलं नाही. या स्मारकाबाबत कुठलीही हालचाल होत नसल्याने माझ्या मतदार संघातील महत्त्वाच्या विषयावर कार्यवाहीसाठी आपल्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Protected Content