Home राष्ट्रीय जम्मू-काश्मीरमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून ३ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून ३ जवान शहीद

0
122

images 3 1
 

काश्मीर (वृत्तसंस्था) उत्तर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ४८ तासांत बर्फवृष्टी झाली. कुपवाडा जिल्ह्यातील अनेक भागांत हिमस्खलनही झाले आहे. माच्छिल सेक्टरमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन जवान शहीद झाले. तर अन्य एक जण बेपत्ता आहे.

 

 

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. लष्कराने या ठिकाणी बचावकार्य हाती घेतले आहे. अनेक जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बांदीपोरा आणि गांदरबल जिल्ह्यात बर्फाखाली अनेक घरं दबली गेली आहेत. त्यामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर गावातही हिमवादळामुळं अनेक घरे उद्ध्वस्त झाली. बर्फाखाली दबलेल्या पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. अन्य बेपत्ता लोकांचा तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound