महाराष्ट्र इंग्लिश स्कूलच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. संदिप पाटील

raver 2

 

रावेर प्रतिनिधी । महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या रावेर मेस्टा तालुकाध्यक्षपदी डॉ.संदीप पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

इंग्रजी माध्यम शाळांच्या संघटनेची जिल्हास्तरीय सभा संस्थापक अध्यक्ष संजयराव तायड़े यांचे अध्यक्षतेखाली बुधवार (दि.८) रोजी हॉटेल के.पी. प्राईड येथे संपन्न झाली. यामध्ये आदित्य इंग्लिश स्कूलचे चेअरमन डॉ.संदीप पाटील यांची रावेर तालुका तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी मेस्टा जळगाव जिल्हाध्यक्ष नरेश चौधरी, पाचोरा प्रा.यशवंत पवार, चाळीसगाव उमाकांत ठाकुर, चोपडाचे व्ही.टी.पाटील, जळगाव आशिष अजमेरा, पाचोरा स्वप्निल पाटील, पिंपळगाव भिका चौधरी, पाचोरा शिवाजी शिंदे, जळगाव मुकुंद कापुरे, चोपडा विलास सपकाळे, चोपडा शशिकांत पाटील यांच्या सह जिल्हाभरातून आलेले संचालक शाळेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Protected Content