माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी चिंताजनकच

नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. मुखर्जी यांच्यावर १० ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. त्यापूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती ट्विट करत दिली होती. त्यांच्यावर दिल्लीच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यांच्या मेंदूत असलेली एक गाठ या शस्त्रक्रियेत काढण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते कोमात गेल्याचे आर्मी रुग्णालयाने सांगितले होते. अद्यापही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

Protected Content