जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; तीन जवान शहीद

बारामुल्ला (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लातल्या क्रेझरी भागात सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक अधिकारी आणि सीआरपीएफच्या दोन जवान शहीद झाले आहे.

जम्मू काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बारामुलाच्या क्रेरी भागात हा क्रूर हल्ला केला. दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ आणि पोलिसांच्या जॉईंट नाका टीमवर बंधुंद गोळीबार केला. हल्ल्यात जम्मू काश्मीर पोलिसांचे स्पेशल पोलीस अधिकारी घटनास्थळीच शहीद झाले. तर सीआरपीएफचे दोन जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु, उपचारा दरम्यान सीआरपीएफच्या दोन्ही जवानांचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

Protected Content