भाजपबाबत नरमाईच्या आरोपावर फेसबुकचे स्पष्टीकरण !

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) आम्ही द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार भडकवणारा कंटेंट प्रतिबंधित करतो. आम्ही कोणताही पक्ष किंवा राजकीय हितसंबंध पाहिल्याशिवाय आमच्या धोरणांची अंमलबजावणी करतो, असे स्पष्टीकरण भाजपबाबत नरमाईच्या आरोपबाबत फेसबुकने स्पष्टीकरण दिले आहे.

 

भारतामध्ये फेसबुकने भाजपा नेते आणि संबंधित काही पेजेसवर कारवाई करण्यास नकार दिल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केले होत. या वृत्तानंतर फेसबुकच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. या वादावर अखेर फेसबुकने खुलासा केला आहे. आम्ही द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार भडकवणारा कंटेंट प्रतिबंधित करतो. आम्ही कोणताही पक्ष किंवा राजकीय हितसंबंध पाहिल्याशिवाय आमच्या धोरणांची अंमलबजावणी करतो. आमच्या बाजूने आणखी काम बाकी असल्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आम्ही या धोरणांची अंमलबजावणी करण्यास आणि आमच्या प्रयत्नांचे नियमित मूल्यांकन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जेणेकरुन निष्पक्षता आणि अचूकता कायम राहील” असे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Protected Content