आदर्श शिक्षक स.ध. भावसार तर्फे निशीकांत माने यांचा सत्कार

 

पारोळा, प्रतिनिधी । येथील निशीकांत माने यांना सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने आदर्श शिक्षक स. ध. भावसार यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

पारोळा येथील तलाठी निशीकांत माने यांना सेवेतील उल्लेखनीय कामकाजाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचा आनंद वाटल्याने राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी आपल्या निवासस्थानी बोलावून शाल, श्रीफळ, पुष्पहार व अभिनंदन पत्र देऊन भावपूर्ण सत्कार केला .आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Protected Content