Home आरोग्य शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह : राजेश टोपे

शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह : राजेश टोपे

0
39


अहमदनगर (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

 

राजेश टोपे पुढे म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आम्ही त्यांना नेहमीच काळजी घेण्याबद्दल सांगत असतो. पण त्यांचा उत्साह मोठा आहे. लोकांच्या प्रती त्यांची बांधिलकी आहे. त्यातून ते लोकांमध्ये जात असतात. कदाचित फिरण्यातून त्यांना काही संदेश द्यायचे असतात. त्या सर्व अनुभवांतून जाण्याचा ते आवर्जून प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते स्वतःही काळजी घेत असून चिंता करण्याचे कारण नाही,’ असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच शरद पवार सातत्याने राज्यभर दौरा करत आहेत. मात्र सध्या राज्यात न फिरण्याची विनंती करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.


Protected Content

Play sound