भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८ टक्के ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५८ टक्के झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

 

 

एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. त्यानुसार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगीतले की, आजच्या घडीला देशभरातले तीन लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर देशातील करोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३ टक्के आहे, जे अत्यल्प आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा १९ दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाउनच्या आधी हे प्रमाण ३ दिवसांवर होते, अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

Protected Content