महावितरण कंपनीच्या अल्यूमिनीअमच्या चोरीच्या तारांसह संशयिताला अटक

नांदूरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खामगाव रोडलगत असलेल्या भंगार गोडावून मधून महावितरण कंपनीच्या अल्यूमिनीअमच्या तार वितळून तयार केलेल्या वस्तू, इतर सामान असा एकुण १ लाख रूपये किंमतीचा मुद्देमालासह संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  नांदुरा खुर्द शिवारातील खामगाव रोड लगत असलेल्या भंगार गोडावून मध्ये महावितरण कंपनीचे विद्युत अल्युमिनियम तार बंडल लपवून ठेवल्याबाबत माहिती पोलीसांना मिळाली.  महावितरण कंपनीचे अधिकारी यांनी छापा टाकून संशयित आरोपी  शेख सोहेल शेख मुक्तार (वय-२०) रा. कुरेशी नगर, नांदुरा जि. बुलढाणा याला अटक केली. त्याच्याकडून  उच्च व लघुदाब विद्युत वाहिनीचे 13 अल्युमिनियम तार बंडल एकुण रक्कम ५२ हजार ६०० रूपये, अल्युमिनियम विद्युत तार वितळवून तयार केलेल्या ४० हजार २०० रूपये किंमतीचे २९ प्लेटा,  विद्युत तार वितळविण्याकरिता उपयोगात येणारी लोखंडी कढई वजन अंदाजे 60 किलो किमती अं.60 किलो किमती अं. 3000/- रू. ,  एक लांब दांडीचा लोखंडी चमचा अंदाजे 200/- रुपये, दोन लांब दांडीचा लोखंडी सांडस प्रती की.अं. 100/- रू प्रमाणे 200/- रुपये  6. एक इलेक्ट्रिक वजन काटा किंमती ८ हजार  असा एकूण १ लाख ४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई  पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मिलिंद जवंजाळ, , कैलास सुरडकर, विनायक मानकर,  अनिल धीरबसी, सुनील सुशीर, रवी सावळे, रवी झगरे, विनोद भोजने यांनी केली आहे.

Protected Content