रस्ते व ड्रेनेज विकासासाठी जळगाव जि.प. कडून ना-हरकत प्राप्त करा; ॲड.अमोल पाटील यांची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव नगरपरिषद हद्दीतील जुना पिंपळगाव रस्ता, जुना नाचणखेडा रस्ता, जुना लोहटार रस्ता,जुना आंचळगाव रस्ता जि.प. जळगावच्या मालकीचे आहेत. परंतु सदर रस्ते हे नगरपरिषद हद्दीत असल्यामुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने सदर रस्ते दुरूस्ती अथवा विकसित करणेकामी अनेक वर्षापासून अनास्था दिसून येते. सदर रस्ते व लगतचे ड्रेनेज भडगाव नगरपरिषदेला विकसित करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेकडून ना-हरकत मिळविण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची मागणी निवेदनाद्वारे भडगाव येथील भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य ॲड.अमोल नाना पाटील यांनी केली आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री.विशाल(पप्पू) पाटील, श्री.शरद हिरे, श्री.मिलिंद बोरसे हे उपस्थित होते.

सदर रस्त्यांलगत भडगाव शहरातील शेतकऱ्यांची शेती असून संबंधित शेतकऱ्यांना,मजूरांना ये -जा करणेकामी प्रचंड कसरत करावी लागते. तसेच शेतीउपयोगी बैलगाडी, ट्रॅक्टर,शेतीमालाच्या वाहतुकीसाठी इ. वाहने ने-आण करतांना अडथळ्यांना सामोरे जावे लागते.

तरी भडगाव न.पा.हद्दीतील जि.प.मालकीचा बाळद रोड विकसित करणेकामी जळगाव जिल्हा परिषदेने ना-हरकत प्रमाणपत्र भडगाव न.पा.ला दिले होते. त्याच धर्तीवर वरील नमूद रस्ते व लगतचे ड्रेनेज विकासासाठी जि.प. कडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळविणे कामी आवश्यक त्या पूर्ततेसह परिपूर्ण प्रस्ताव मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.जळगाव यांचेकडे पाठविणेस  विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याप्रसंगी शुभम पाटील,रितेश पवार, सागर परदेशी,सुशांत पाटील, अभिजित पाटील,तुषार पाटील,निखिल पाटील यांचीही उपस्थिती होती.

Protected Content