Suicide : वृध्द महिलेची गळफास घेवून आत्महत्या

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील न्हावी येथील ७० वर्षीय वयोवृध्देने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, ‘निर्मलाबाई मुरलीधर पाटील रा. पाटील वाडा, न्हावी ता. यावल ह्या ७० वर्षीय वयोवृध्द महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २५ एप्रिल रोजी घरात कुणीही नसतांना दुपारी पंख्याला दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

महिलेच्या कुटुंबातील सदस्य घरी आल्यावर वयोवृध्दाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. त्यांनी तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश बऱ्हाटे करीत आहे.

Protected Content