Home क्राईम विवाहितेचा विनयभंग करून संशयित पसार

विवाहितेचा विनयभंग करून संशयित पसार

0
29

पहूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी विवाहितेचा विनयभंग करून तिच्या पतीला छताच्या भिंतीवर ढकलून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात विवाहिता ही आपल्या पती व मुलीसह वास्तव्याला आहे. २५ एप्रिल रोजी विवाहिता ही घराच्या छतावर पती व मुलगी यांच्यासोबत झोपलेली असतांना गावातील संशयित आरापेपी राहूल उर्फ शुभम लक्ष्मण सोनवणे हा विवाहितेजवळ झोपलेल्या ठिकाणी आला व साडी ओढून विनयभंग केला. दरम्यान विवाहितेला जाग आल्यावर तिने आरडाओरड केली. त्यावेळी तिचे पती उठल्यावर संशयित आरोपीला जागीच पकडले. त्यावेळी संशयित आरोपीने विवाहितेच्या पतीचा जोराचा धक्का देवून छताच्या भिंतीवर ढकलून दिल्याने गंभीर जखमी झाले. विवाहितेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राहूल उर्फ शुभम लक्ष्मण सोनवणे याच्यावर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हंसराज मोरे करीत आहे.06:21 PM


Protected Content

Play sound