चाळीसगावात बैलजोडी आणि गायींची चोरी

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पाटणादेवी रोडलगत असलेल्या शेतातून दोन बैल व दोन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विठ्ठल भागवत आगोणे (वय-३५) रा. धनगर गल्ली, पाटणादेवी रोड चाळीसगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता विठ्ठल आगोणे यांनी त्यांचे दोन बैल व दोन गायीचा चारापाणी करून झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ६६ हजार रूपये किंमतीचे दोन बैल आणि दोन गायी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. त्यांनी परिसरात सर्वत्र गुरांची शोध घेतला परंतू कुठेही आढळून आले नाही. अखेर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अभिमन पाटील हे करीत आहे.

Protected Content