जैतपिर येथील ७ वीच्या विद्यार्थ्याना निरोप

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जैतपिर येथील जिल्हा परिषद केंद्र (प्राथमिक) शाळेत इ. ७ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.

 

जिल्हा परिषद केंद्र (प्राथमिक) शाळेच्या इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी शाळेतील केंद्र प्रमुख गोसावी सर, मुख्याध्यापक कनिराम जाधव, शिक्षक रविंद्र बोरसे सर, प्रदिप पाटील सर, संजय शिसोदे , विजय मोरे, शिक्षिका कविता पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण शिक्षणासाठी मार्गदर्शन करुन तथा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थी यांना पुष्पहार व पूलगुच्छ देयुन निरोप देण्यात आला. यावेळी विशेष सहकार्य व मार्गदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकेश राजपुत यांनी केले. जि.प. केंद्र (प्राथ) शाळा जैतपिर लवकरच सेमी इंग्रजी इ. १ ते ७ साठी सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मुकेश राजपुत यांनी दिली.

Protected Content