Home Uncategorized नांद्रा बुद्रुक येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

नांद्रा बुद्रुक येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील  उमेश दिनेश पाटील (वय-२३) या तरूणाने राहत्या घराच्या स्वच्छतागृहात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नांद्रा बुद्रूक येथे उमेश हा वडील दिनेश व आई जयाबाई यांच्यासह वास्तव्यास होता. तो एमआयडीसीतील एका कपंनीत कामाला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तो घरीच होता. त्यामुळे मिळेल ते काम करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करायचा. दरम्यान, दोन दिवसांपासून उमेश हा आजारी होता. आज शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वडील शेतात कामाला निघून गेल्यानंतर आई घरात काम करित असताना उमेशने ९ वाजेच्या सुमारास घराच्या स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजून आले नाही. 


Protected Content

Play sound